निवड चाचणीविषयी माहिती

निवड प्रक्रिया २ स्तरांवर राबविली जाईल:

प्रथम स्तर

१. ऑन लाईन लेखी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षा
२. निकालावर आधारित उमेदवारांची निवड


द्वितीय स्तर (प्रथम स्तरावर निवड झालेल्या उमेदवारांसाठी)

१. दिलेल्या विषयांवर संक्षिप्त टिपण
२. गटचर्चा
३. निवडलेल्या अर्जदारांची वैयक्तिक मुलाखत
४. अंतिम निवड जाहीर करणे


निवड झालेल्या युवकांना शासनाचे विविध विभाग, मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिवांचे कार्यालय, विविध विभाग प्रमुखांची कार्यालये किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून काम करण्याची संधी मिळेल.


निवड प्रक्रियेची माहिती

पहिला टप्पा

पात्रता यादीचे निकष

 • ऑन लाईन लेखी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षा
 • संक्षिप्त टिपण
 • एकूण १०० गुण
 • सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या २०० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
 • ‘निवड चाचणी तपशील- टप्पा पहिला’ यामध्ये प्रत्येक भागाविषयी सविस्तर माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.

दुसरा टप्पा

 • दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक कागदपत्रे : मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेल्या उमेदवाराने सोबत मूळ गुणपत्रिका, सर्व गुणपत्रिका व इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रांचा एक छायांकित संच आणि मूळ ओळखपत्र सोबत आणावे.
 • मुलाखत व गटचर्चा : पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी व गटचर्चा करिता बोलावले जाईल. दिनांक आणि वेळ पात्र उमेदवारास कळवली जाईल.
 • मुलाखतीसाठी प्रवासाची प्रतिपूर्ती : मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारे प्रवास खर्चाची प्रतिपूर्ती केली जाणार नाही.
 • निकाल व फेलोशिपचा प्रस्ताव : सर्व उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना फेलोशिपसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल.

निवड चाचणीचा तपशील

पहिला टप्पा सविस्तर माहिती:-

 • लेखी चाचणीचे स्वरूप : ऑनलाइन चाचणी घेण्यात येईल. यात बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असेल
 • माध्यम : इंग्रजी
 • एकूण भाग : दोन
 • भाग एक : बौध्दिक क्षमता आणि परिणामवाचक अभिक्षमतेवरील ५० प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल.
 • भाग दोन : माहिती तंत्रज्ञानावरील एकूण ५० प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल.
 • वेळ : भाग एक व दोन मिळून एकत्रित वेळ दीड तास (९० मि.)
 • एकूण गुण : १००
 • पात्रतेसाठी प्रत्येक भागात मिळावयाचे किमान गुण : ५० टक्के

चाचणी भाग १ सविस्तर माहिती

 • या चाचणीत तीन क्षमता अथवा कौशल्यावर आधारीत प्रश्न असतील.
 • विश्लेषणात्मक तार्किक (ॲनॅलिटीकल रिझनींग स्किल) कौशल्यासाठी १५ गुण
 • परिणामवाचक कौशल्य (१५ गुण) : अंकगणित, प्राथमिक बीजगणित आणि भूमितीच्या सर्वसामान्य संकल्पना.
 • वाचन कौशल्य(२० गुण) : वाचनलब्ध आकलन, वाक्य पूर्ण करा आणि वाक्यातील दुरुस्ती.

भाग-२ सविस्तर माहिती

 • खालील बाबी आणि कौशल्यावर चाचणी परीक्षा घेण्यात येईल.
 • विडोंज 2010(5 गुण)
 • एमएस वर्ड 2010(10 गुण)
 • एमएस एक्सेल 2010(10 गुण)
 • एमएस पावर पाँइट 2010(10 गुण)
 • एमएस एक्सेस 2010 (5 गुण)
 • इंटरनेट एक्सप्लोरर 2010 (10 गुण)

दुसरा टप्पा सविस्तर माहिती:-

 • ऑन लाईन लेखी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षा व संक्षिप्त टिपण परीक्षा यातून मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे कमाल २०० उमेदवारांना मुलाखत आणि गटचर्चेसाठी बोलाविले जाईल.
 • गटचर्चेसाठी व मुलाखतीसाठी अनुक्रमे ४० व ६० गुण देण्यात येतील.
 • ऑन लाईन लेखी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षा, संक्षिप्त टिपण, गटचर्चा, मुलाखत इ. च्या एकत्रित गुणांच्या आधारे अंतिमतः ५० फेलो निवडण्यात येतील.