अटी

  • मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पूर्ण वेळ कार्यक्रम असून फेलोशिपच्या कार्यकाळात फेलोजना इतर नोकरी, खाजगी प्रॅक्टीस वा शैक्षणिक अभ्यासक्रम स्वीकारता येणार नाही.
  • या ११ महिन्यांच्या कार्यक्रमात एकदाच सहभागी होता येते, मुदतवाढीची तरतूद नाही.
  • हा फेलोशिप कार्यक्रम नोकरीची कोणतीही हमी देत नाही.
  • ज्या कार्यालय वा प्राधिकरणासोबत फेलो काम करेल त्या कार्यालयाच्या कामाच्या वेळा फेलोसही लागू राहतील.
  • फेलोजना कामाच्या गरजेनुसार अधिक तास काम करणे किंवा प्रवास करणे आवश्यक राहील.
  • फेलोजना कार्यक्रमाच्या सुरुवातीस चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • फेलोशिपच्या कालावधीत जेथे नेमणूक केलेली आहे त्या शहर व जिल्ह्यामध्ये फेलोस वास्तव्य करावे लागेल.
  • बाहेरून येणाऱ्या फेलोजच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही.

* कृपया मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा दिनांक २४/५/२०१७ चा शासन निर्णय काळजीपूर्वक वाचवा.