पात्रता

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रतेचे निकष आहेत.


  • १. दिनांक ०१ एप्रिल, २०१८ रोजी अर्जदाराचे वय २१ ते २६ वर्षे दरम्यान असावे. (जन्मदिवस १/४/१९९२ ते १/४/१९९७, दोन्ही दिवस अंतर्भूत, या दरम्यान असावा).
  • २. उमेदवार कोणत्याही शाखेचा प्रथमवर्ग पदवीधर असावा. समर्पक पदव्युत्तर पदवी वा व्यावसायिक पदविका यांना अधिकचे गुण राहतील.
  • ३. उमेदवाराकडे किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्णवेळ इंटर्नशिप, आर्टिकलशिप वा अॅपरेंटीसशिप अनुभवाच्या कार्यकाळात गणली जाईल.
  • ४. मराठी भाषेचे ज्ञान, इंटरनेट व संगणकावर काम करण्याची क्षमता उमेदवाराकडे असावी. हिंदी व इंगजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील.