फायदे

प्रमाणपत्र

फेलोशिप कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व उमदेवारांना प्रमाणपत्रे दिली जातील.


विमा संरक्षण

नियुक्ती प्राधिकारी निर्धारित करेल, अशी वैयक्तिक विमायोजना अंतर्गत विमा उतरविण्याबाबत वित्त विभागाच्या नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.


कामाचे वातावरण

इंटरनेट सुविधेसह संगणक सुविधा, ग्रंथालय, विकासशील साहित्य आणि व्यासपीठासह, अत्याधुनीक सोयी सुविधा उपलब्ध.


कामाची वेळ

  • कामाचे दिवस आणि तास सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० (सोमवार ते शनिवार, रविवारी सुटी).
  • रजा: फेलोशिपच्या काळात सात नैमित्तीक रजा मिळतील.

प्रशिक्षण आणि विकास सुविधा

  • फेलो म्हणून नियुक्तीनंतर सात दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येईल.

दौऱ्यातील लाभ

  • फेलोंना कर्तव्यासाठी मुख्यालयापासून अन्यत्र प्रवास करण्यासाठी दरमहा रु. 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) प्रवासभत्ता म्हणून देण्यात येतील.