अनुभव

सी.एम. वॉर रूमचा एक भाग असल्यानं मेट्रोसारख्या महत्त्वाच्या मेगा-प्रोजेक्टला वेग देण्यात आणि या प्रोजेक्टची पाहणी करण्यात मला सहभागी होता आलं. आर्टिफिशियल इंटलिजंससाठी वधवानी इंस्टिट्यूटची स्थापना करणं आणि Magnetic Maharashtraचं व्यवस्थापन करणं हा खरंच एक जबरदस्त अनुभव होता. या दोन्ही उपक्रमांचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते ज़ालं होतं.

जनक शाह

मुंबई

मी सध्या उन्नत महाराष्ट्र अभियानासाठी CTARA IIT-B सोबत काम करतोय. शासनाच्या विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, यासाठी मी प्रयत्नशील असतो. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्र भरातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेससोबत काम करताना मिळणारा आनंद खरंच शब्दांपलीकडचा आहे.

सुहेल शेख

छत्तीसगड

माननीय वनमंत्री यांच्या प्रोजेक्ट ऑफिसचा एक भाग या नात्यानं मी ५० कोटी वृक्ष लागवड आणि इको-टुरिज़मचा विकास अशा महत्त्वाच्या उपक्रमांवर काम करतोय. महाराष्ट्राच्या वन विभागाचे उपक्रम शाश्वत असावेत व प्रभावीपणे राबविले जावेत यासाठी वन विभाग आणि खासगी क्षेत्रातल्या संस्था यांना एकत्र आणण्याचे काम करण्याची संधी मला लाभली

अमित कोठावदे

नाशिक

जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यासोबत फेलो म्हणून काम करताना मला उपजीविका, वने, सूक्ष्म नियोजन, प्रशासनातील तंत्रज्ञान ह्या विषयांशी संबंधित अनेक विभागांमध्ये काम करण्याचा अतिशय व्यापक अनुभव मिळाला. जनतेच्या हिताचे कार्य करण्यासाठी सरकारची असलेली असीमित क्षमता व कामाची व्याप्ती ह्या फेलोशिपमध्ये मला अनुभवता आली.

श्रीकांत गरिमेल्ला

विशाखापट्टणम

मा. मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या सहभाग या सोशल रिस्पॉन्सिबिलीटी सेल सोबत काम करताना मला अनेक संकल्पना आखता आल्या आणि प्रत्यक्षात राबविता आल्या. कृषी, हस्तकला व पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत ग्रामीण विकासासाठी मी विविध समाज घटकांसोबत काम करीत आहे. सध्या राज्याच्या हस्तकला धोरणाचा मसुदा तयार करण्याच्या कामात मी गुंतले आहे.

किरण पवार

पुणे

मी आदिवासी विकास विभागासोबत काम करतोय. आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी वन संरक्षणाच्या माध्यमातून आदिवासींसाठी उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी विविध प्रकल्पांची आखणी मी करीत आहे. आदिवासींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारं काम माझ्या हातून होतंय याचा मला आनंद होतोय.

संकेत जोशी

सातारा

मी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनासोबत काम करत आहे. GIS तंत्रज्ञानाचा वापर करून मालमत्ता सर्वेक्षण व कर संकलन यासारख्या सुशासनासाठी आवश्यक असणाऱ्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमात मी सध्या सहभागी आहे. तंत्रज्ञान ते सामाजिक-आर्थिक समावेशकता अशा अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याची संधी मला मिळत आहे.

निकिता निंबाळकर

कोल्हापूर

पीएमआरडीए सोबत काम करताना हायपरलूप, पुणे रिंग रोड, पुणे मेट्रो यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमांत सहभागी होण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे. रिंग रोडसाठी महापालिकेच्या बॉंड्सच्या माध्यमातून निधी उभारणी करण्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पात मी सहभागी होतो. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा लोगो तयार करण्याची संधीही मला मिळाली याचा मला आनंद आहे.

अरमीत नारंग

पुणे

भारत सरकारच्या महत्त्वपूर्ण मिशन स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी राज्यातील समन्वय आणि अंमलबजावणीच्या कामात मी सहभागी आहे. या प्रकल्पांतर्गत विविध उपक्रमांची आखणी, शासनस्तरावरील निर्णयप्रक्रिया, प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे कामकाज आणि स्थानिक संस्थांशी समन्वय अशा विविध पातळ्यांवर माझा सहभाग आहे.

निलेश बर्डे

बुलढाणा

मी अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) यांच्या सोबत काम करतेय. पोलीस विभागाचे काम अधिक कार्यक्षम होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर निर्णय प्रक्रिया data driven असावी यासाठी मी प्रयत्नशील आहे. राज्यभरातील पोलीस मोटर ट्रान्सपोर्ट युनिट्सच्या कामगिरीचे विश्लेषण आणि अहवाल तयार करण्याचे महत्त्वाचे कामही मी करीत आहे .

इशिता पालीवाल

राजस्थान

औरंगाबाद कलेक्टर कार्यालयासोबत विविध ई-गव्हर्नन्स प्रकल्पांवर काम केले. व्यवस्थेसोबत काम करून बदल घडवून आणण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला मिळाली.

प्रियांका वझे

औरंगाबाद

राज्य दुष्काळ मुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाची ऑनलाईन मॉनिटरींग सिस्टीम मी विकसित केली. मुख्यमंत्री महोदयांच्या दुष्काळ मुक्तीच्या स्वप्नात मी माझे योगदान देऊ शकलो.

प्रसाद भोई

नंदुरबार

मुख्यमंत्री वॉर रूम मध्ये काम करताना मुख्यतः विदर्भातील सिंचन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले होते. राज्याच्या विकासासाठी आपले योगदान देण्याचा अनुभव खूप समाधानकारक होता.


अक्षय गुजर

सातारा

मी मुख्यमंत्री वॉर रूमच्या माध्यमातून विविध पायाभूत प्रकल्पांवर काम केले. या कार्यकाळात ‘आपले सरकार’ या तक्रार निवारण पोर्टलच्या अंमलबजावणीत मी योगदान देऊ शकलो याचा मला आनंद आहे.

अपूर्व पेठकर

नागपूर

जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा नियोजन समिती, नाशिक यांच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळाली. मी अंमलात आणलेल्या विविध आय. टी. प्रकल्पांमुळे यंत्रणेमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्त्व आले.

असीम अत्तार

नाशिक

सिडको सोबत स्मार्ट सिटी व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पांवर कामे केली. फेलोशिपच्या कार्यकाळात प्रकल्प व्यवस्थापनासाठी एक सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन विकसित केल्याचा मला आनंद आहे.

भक्ती मेहता

मुंबई