अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय ही राज्य शासनाची प्रमुख सांख्यिकीय संस्था म्हणून कार्यरत असन आयुक्तालयास राज्यातील सांख्यिकीय बाबींसाठी "नोडल एजन्सी " म्हणून घोषित करण्यात आले आहे. सांख्यिकीय बाबींसंबंधी राज्य आणि केंद्र सरकार मधील दुवा म्हणूनही हे आयुक्तालय काम पाहते.