ईमेल-आयडी: cmfellowship-mah@gov.in
मुख्यमंत्री फेलोशिपने मला प्रशासनासोबत काम करताना निव्वळ वेगळ्या पद्धतीनेच नव्हे, तर तर्कशुद्धपणे विचार करण्यास प्रोत्साहन दिले. प्रशासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधून उपलब्ध संसाधनांचा प्रभावी उपयोग घडवून आणण्याची समज मला येथे मिळाली. नाविन्यपूर्ण कल्पना सुचविण्यासोबतच त्यांच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी फेलोशिपमुळे मिळाली. प्रशासनाचा भाग बनून त्यातील बारकावे समजून घेण्याची संधी व जबाबदार नागरिक होण्यासाठीची भक्कम पायाभरणी या फेलोशिपने केली.