ईमेल-आयडी: cmfellowship-mah@gov.in | हेल्पलाईन - +917066 951951, सोम-शनी (09:30am to 05:30pm)

निवड प्रक्रिया

प्रबळ विश्लेषणात्मक क्षमता, समाज सेवेप्रती वचनबद्धता आणि प्रशासकीय आव्हाने हाताळण्याची क्षमता असलेल्या तरुण व्यावसायिकांना सहभागी करून घेणे हे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. उमेदवारांची बौद्धिक क्षमता आणि कार्य क्षेत्राबद्दल त्यांना असलेली जाण समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून निवड प्रक्रिया आखलेली आहे.


पात्रता:

वयोमर्यादा
अर्जदाराचे वय अर्ज सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक 8 मे 2026, रोजी 21 वर्षे ते 26 वर्षे दरम्यान असावे. दिनांक 08 / 05 / 2000 ते दिनांक 08 / 05 / 2005 या दरम्यान (दोन्ही दिवस अंतर्भूत) जन्मलेल्या व्यक्ती मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, २०२६ साठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

शैक्षणिक पात्रता:

उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि त्याला किमान 60% गुण मिळालेले असावेत.

कामाचा अनुभव:

उमेदवाराकडे किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा.
व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटिसशिप / आर्टिकलशिप अनुभव म्हणून ग्राह्य धरली जाईल.
पूर्णवेळ स्वयंरोजगार किंवा उद्योजकतेचाही अनुभव म्हणून विचार केला जाईल.

निवड कार्यपद्धती:

टप्पा 1
भाग 1: परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ चाचणी व निबंध लेखन परीक्षा
भाग 2: वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या 210 उमेदवारांची पुढील टप्प्यासाठी प्राथमिक निवड

टप्पा 2
भाग 1: प्राथमिक निवड झालेल्या 210 उमेदवारांच्या निबंधांचे मूल्यांकन
भाग 2: वैयक्तिक मुलाखत
भाग 3: अंतिम निवड झालेल्या 60 उमेदवारांची यादी जाहीर

ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप:

बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न (MCQs)
माध्यम - इंग्रजी. शक्य असेल तेथे प्रश्न आणि पर्यायी उत्तरांचे मराठी भाषांतर उपलब्ध करून दिले जाईल.
एकूण गुण - 100, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल.

कालावधी - 60 मिनिटे.

निबंध

दिलेल्या ३ विषयांपैकी १ विषयावर
भाषा - इंग्रजी किंवा मराठी. निबंध परीक्षा केंद्रावर संगणकावर टंकलेखीत करणे अपेक्षित आहे. मराठीतही टंकलेखन फोनेटिक किंवा टाईपराईटर पद्धतीने करता येईल.
शब्द संख्या - कमाल 500 शब्द

कालावधी - 45 मिनिटे


वस्तुनिष्ठ चाचणीचे स्वरूप


अ. क्र.

विषय

प्रश्नांची संख्या

तपशील

1

सामान्य ज्ञान

20

चालू घडामोडी, भारताशी व महाराष्ट्राशी संबंधित सामाजिक व आर्थिक विषय

2

तर्कशक्ती

20

निष्कर्षात्मक तर्कशक्ती, आगमनात्मक तर्कशक्ती, कारण आणि परिणाम यांवरील तर्कशक्ती

3

इंग्रजी भाषा

05

व्याकरण आणि रचना

4

मराठी भाषा

05

व्याकरण आणि रचना

5

माहिती तंत्रज्ञान

05

वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट्स, प्रेझेंटेशन्स, एआय

6

परिमाणात्मक क्षमता

10

माहिती विश्लेषण, अंकगणित, बीजगणित, मूलभूत भूमिती

7

कौशल्ये

20

समीक्षात्मक विचार, समस्या निराकरण, निर्णय क्षमता, इत्यादी.

8

गुणवैशिष्ट्ये

15

धोरण आणि प्रशासन क्षेत्रातील व्यावसायिकांकडे आदर्शतः असावेत असे वैयक्तिक गुण, जसे की कणव, लवचिकता, स्वयंस्फूर्ती इत्यादी


अंतिम निवड

उमेदवारांच्या अंतिम निवडीकरीता खालीलप्रमाणे गुणांकन पद्धत वापरली जाईल.


वस्तुनिष्ठ चाचणीस 30% गुणभार, निबंधास 20% गुणभार, व वैयक्तिक मुलाखतीस 50% गुणभार.
अंतिम निवड झालेल्या 60 उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.


कृपया नोंद घ्या

मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांस आपल्यासोबत सर्व गुणपत्रिका, अनुभवाची प्रमाणपत्रे, ओळखपत्र व इतर संबंधित कागदपत्रांची मूळ प्रत व नक्कल आणणे आवश्यक आहे.
मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखतीचा दिवस व वेळ इमेल द्वारे कळविण्यात येईल.
ऑनलाइन चाचणीस व मुलाखतीस हजर राहण्यासाठी उमेदवारांना प्रवासखर्च किंवा इतर कोणताही खर्च देण्यात येणार नाही.