ईमेल-आयडी: cmfellowship-mah@gov.in | हेल्पलाईन - +917066 951951, सोम-शनी (09:30am to 05:30pm)
१. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पूर्ण वेळ कार्यक्रम असून फेलोशिपच्या कार्यकाळात फेलोंना इतर नोकरी, खाजगी प्रॅक्टीस, असाईनमेंट किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम (आयआयटी बॉम्बे, मुंबई यांनी फेलोशिपसाठी तयार केलेल्या विशेष अभ्यासक्रमाखेरीज) स्विकारता येणार नाही.
२. या १२ महिन्यांच्या कार्यक्रमात एकदाच सहभागी होता येते व मुदतवाढीची किंवा पुनर्नियुक्तीची तरतूद नाही.
३. १२ महिन्यांच्या कालावधीनंतर हा कार्यक्रम नोकरीची कोणतीही हमी देत नाही.
४. ज्या प्राधिकरणासोबत फेलो काम करेल त्या प्राधिकरणाच्या कामाच्या वेळा फेलोसही लागू राहतील.
५. फेलोंना कामाच्या गरजेनुसार अधिक तास काम करणे किंवा प्रवास करणे आवश्यक राहील.
६. फेलोंच्या मुलाखतीच्यावेळी शैक्षणिक अर्हता, अनुभव, वय तसेच ओळखपत्र आदी संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. फेलोंनी रूजू होताना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. नियुक्तीनंतर फेलोंची पोलीस पडताळणी केली जाईल.
७. फेलोशिपच्या कालावधीत ज्या प्राधिकरणांतर्गत नेमणूक केलेली आहे त्या प्राधिकरणाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्य करावे लागेल.
८. फेलोंच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही.
९. नियुक्तीचे पत्र (ऑफर लेटर) मिळाल्यानंतर रुजू होण्याच्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे बंधन फेलोंवर असेल. अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द केली जाईल.
१०. फेलोशिपच्या कालावधीत फेलो कुठल्याही राजकीय चळवळीत भाग घेऊ शकणार नाही.
११. अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती समजून घेण्यासाठी अर्जदारांनी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा दिनांक 8 एप्रिल 2026 चा शासन निर्णय काळजीपूर्वक वाचावा.