भारत हा युवा देश आहे आणि तीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. हे लक्षात घेता आम्ही महाराष्ट्रात मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू करत आहोत. हा कार्यक्रम युवकांना शासनासोबत जवळून काम करण्याची व राज्याच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची संधी देईल. सार्वजनिक धोरणांवर काम करण्याचा अनुभव व त्यातून मिळालेले धडे अतुलनीय ठरतील.
मी महाराष्ट्राच्या विकास यात्रेत माझ्या तरुण मित्रांसोबत काम करण्यास उत्सुक आहे.
युवकांसोबत काम करणे नेहमीच आनंददायक असते. बुद्धिमत्ता व हिम्मत ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांची सर्जनशीलता व उत्साह आपल्याला भुरळ घालतो. हा लोकसांख्यिकी लाभांश (demographic dividend) महाराष्ट्राच्या विकासात मोलाचा ठरणार आहे, असा माझा ठाम विश्वास आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामुळे तरुण आणि तेजस्वी मुलांना शासनाचा भाग बनून काम करण्याची संधी मिळते.
महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी आमच्या सोबत येण्याचे मी माझ्या सर्व तरुण मित्रांना आवाहन करतो.
ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत स्वत:मध्ये अनेक कौशल्ये निर्माण करण्याची संधी देणारे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हे एक अद्वितीय माध्यम आहे.
अधिक वाचाराज्यातील सर्वात वंचित घटकांसाठी मी शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांचा विकास इत्यादी क्षेत्रात महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाने मला माझी व्यावसायिक व वैयक्तिक कौशल्ये विकसित करण्याची संधी दिली. ही फेलोशिप प्रशासनातील लॅटरल एंट्री प्रमाणे आहे.
अधिक वाचा