१) फेलोंना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याच्या समकक्ष दर्जा राहील.
२) फेलोशिपच्या कार्यकाळात कार्यालयीन वापराकरिता तात्पुरते ओळखपत्र व इमेल आयडी दिले जाईल.
३) दरमहा रु. ७०,०००/- विद्यावेतन तसेच प्रवास व अनुषंगिक खर्चासाठी दरमहा ठोक रु. ५,०००/- असे एकूण रु. ७५,०००/- छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.
४) फेलोशिपच्या कार्यकाळात एकूण ८ दिवसांची रजा अनुज्ञेय राहील.
५) फेलोशिपच्या कार्यकाळासाठी अपघात विम्याचे संरक्षण देण्यात येईल.
६) आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाच्या पूर्ततेचे स्वतंत्र प्रमाणपत्र संबंधित संस्थेमार्फत देण्यात येईल.
७) १२ महिन्यांचे फिल्डवर्क व आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांच्या मार्फत राबविला जाणारा विशेष अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या फेलोंना शासनामार्फत फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.