ईमेल-आयडी: cmfellowship-mah@gov.in
मुख्यमंत्री फेलोशिप २०२६ च्या निवड प्रक्रियेतील टप्पा २ (वैयक्तिक मुलाखत) साठी निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांना नेमून दिलेल्या दिनांक व वेळेसाठी मुलाखतीचे वेळापत्रक पाहावे.
वेळापत्रक बघण्यासाठी क्लिक करा
नियुक्त केलेल्या दिनांक व वेळेस अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचा कोणत्याही परिस्थितीत मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही.
उमेदवारांनी मुलाखत केंद्रावर स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रवास, निवास किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या खर्चाची प्रतिपूर्ती केली जाणार नाही.
१. शैक्षणिक पात्रतेचा पुरावा म्हणून मूळ गुणपत्रिका व प्रमाणपत्रे तसेच त्यांची प्रत्येकी एक स्वयंप्रमाणित छायांकित प्रत.
२. मूळ अनुभव प्रमाणपत्रे तसेच त्यांची प्रत्येकी एक स्वयंप्रमाणित छायांकित प्रत.
३. जन्मतारखेचा मूळ पुरावा तसेच त्याची एक स्वयंप्रमाणित छायांकित प्रत.
४. स्वयंरोजगाराच्या बाबतीत, स्वयंरोजगाराचे स्वरूप व कालावधी नमूद करणारे स्वयंघोषणापत्र तसेच व्यवसायाचा पत्ता, नोंदणी क्रमांक, संकेतस्थळ व पडताळणीसाठी उपयुक्त इतर तपशील.
५. अलीकडील दोन रंगीत पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (अर्जामध्ये अपलोड केलेले छायाचित्र असल्यास उत्तम).
६. ऑनलाईन अर्जाची मुद्रित प्रत (उमेदवाराच्या लॉगिन खात्यामध्ये उपलब्ध).
७. एक मूळ फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना इत्यादी) तसेच त्याची एक स्वयंप्रमाणित छायांकित प्रत.
८. दिनांक ७ जून २०२६ रोजी झालेल्या ऑनलाईन परीक्षेसाठी वापरलेले मूळ प्रवेशपत्र.
मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ उपकरणे तसेच इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने नोंदणीच्या वेळी जमा करणे आवश्यक राहील. ही साधने उमेदवाराने मुलाखत प्रक्रिया पूर्ण करून केंद्रातून बाहेर पडताना परत दिली जातील.
अर्थ व सांख्यिकी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय
८ वा मजला, प्रशासकीय इमारत,
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय,
शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व),
मुंबई - ४०००५१