मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून मला शासन तसेच प्रशासन स्थानिक स्तरावर कसे काम करतात याचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. प्रधान मंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, जीआयएस-आधारित मालमत्ता कर मूल्यांकन प्रणाली यांसारख्या विविध प्रकल्पांवर मला काम करता आले. त्यासोबतच माझ्या पसंतीच्या हॅपी स्कूल प्रकल्प, POCSO कायद्याबद्दल जाणीवजागृती, सेंट्रल लायब्ररीचे सशक्तीकरण इ. प्रकल्पांवरही काम करण्याची संधी मला मिळाली. ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत स्वत:मध्ये अनेक कौशल्ये निर्माण करण्याची संधी देणारे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हे एक अद्वितीय माध्यम आहे.
पुढे