ईमेल-आयडी: cmfellowship-mah@gov.in

teacher

प्रशांत पाटील

प्लेसमेंट- युएन अ‍ॅक्शन रूम टू रिड्युस पॉवर्टी

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासनासोबत काम करण्याची अद्वितीय संधी तुम्हाला मिळते. नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन व संयुक्त राष्ट्रसंघाचे भारतामधील कार्यालय यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या ‘युएन अ‍ॅक्शन रूम टू रिड्युस पॉवर्टी’ वर मी काम करत होतो. संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या शाश्वत विकास ध्येयांचे (Sustainable Development Goals) महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून स्थानिकीकरण व मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या २७ तालुक्यांमध्ये उपजीविका निर्मिती यावर मी काम करीत होतो. येथे मी धोरण निर्मिती व त्याची अंमलबजावणी यामध्ये थेट योगदान देत होतो. अनेक आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संस्था, व माविम, एमएसआरएलएम, बीआरटीसी यांसारख्या शासकीय संस्थासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. माझ्या व्यावसायिक शिक्षण व वाढीस या कार्यक्रमामुळे चालना मिळाली.

पुढे