ईमेल-आयडी: cmfellowship-mah@gov.in

teacher

डॉ. मयूर मुंढे

प्लेसमेंट- आदिवासी विकास विभाग

माझी निवड झाली तेव्हा प्रामुख्याने व्यापक तंबाखू व्यसनमुक्ती कार्यक्रमावर काम करायचे असेल असे मला सांगण्यात आले होते. मात्र जेव्हा आदिवासी विकास विभागात मी रुजू झालो तेव्हा माझ्या समोर मी करू शकेन अशी अनेक कामे होती. राज्यातील सर्वात वंचित घटकांसाठी मी शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांचा विकास इत्यादी क्षेत्रात महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे. अशा विविध प्रकल्पांवर धोरणात्मक स्तरापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंतचे काम काही वेळा दडपवून टाकणारे परंतु तेवढेच रोमांचक असते. उत्तम सहकारी व प्रचंड संधी अशा सकारात्मक वातावरणामुळे आदिवासी विकास विभागातील प्रत्येक दिवस भारावलेला असतो.

पुढे