ईमेल-आयडी: cmfellowship-mah@gov.in
मुख्यमंत्री फेलो म्हणून माझा प्रवास लक्षणीय होता. या कार्यक्रमामुळे व्यक्ती म्हणून माझ्यात सकारात्मक बदल झाला आहे. माझी सामाजिक बांधिलकीची भावना भक्कम झाली आहे. अकोला जिल्हा प्रशासनासोबत काम करत असताना पर्यावरण संरक्षण, रोजगार निर्मिती, घन कचरा व्यवस्थापन, ग्रामविकास, औद्योगिक विकास, गरिबी निर्मूलन व आरोग्य अशा वैविध्यपूर्ण प्रकल्पांवर काम करता आले. प्रत्यक्ष जनमानसात राहून प्रश्न समजून घेण्याची व ग्रामपंचायतीपासून मंत्रिमंडळापर्यंत सर्वांच्या सहयोगातून उत्तरे शोधण्याची संधी या कार्यक्रमातून मला मिळाली. एवढ्या व्यापक स्तरावर काम करणे इतरत्र शक्य झाले नसते. मी सर्वांनाच ही संधी घेण्याची विनंती करेन.
पुढे