ईमेल-आयडी: cmfellowship-mah@gov.in
मुख्यमंत्री फेलोशिपचा प्रवास खुपच समृद्ध व तितकाच आव्हानात्मक आहे. सार्वजनिक धोरण क्षेत्रामध्ये ज्यांना आपली कारकीर्द करायची आहे त्यांच्यासाठी हा अगदी योग्य कार्यक्रम आहे. नियोजन विभाग व संयुक्त राष्ट्र यांनी संयुक्तपणे राबविलेल्या अॅक्शन रूम टू रिड्युस पॉवर्टी मध्ये काम करताना मला धोरण आखणी कशी होते याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. माझे काम Sustainable Development Goals शी संबंधित होते. आंतरराष्ट्रीय मापकांची राज्यपातळीवर अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांना प्रणालीबद्ध करण्याचा अनुभव अद्वितीय व आव्हानात्मक होता. या प्रक्रियेत नवनवीन कल्पना, घडामोडी अभ्यासता आल्या.
पुढे